January19 , 2025

    महिला सबलीकरण – समान ध्येयासाठी कार्यरत

    Related

    RGP holds all Goa active members meet at Porvorim.

    RGP holds all Goa active members meet at Porvorim...

    Calangute Police arrested man impersonating himself as an IAS officer.

    On 29.12.2024 registered an offence vide Calangute PS Cr....

    Share

    पणजी – महिलांचे सबलीकरण तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण यावर लक्ष केद्रीत करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष व बीएनआय उत्तर गोवा चॅप्टर एलेगन्सचे सदस्य रिनाल्डो रोझारियो यांनी साखळीतील लाईफटाईफ फाऊंडेशनला भेट देऊन सामाजिक समस्यांवर विचारविनिमय केला.
    दंतवैद्य आणि बीएनआय एलेगन्सच्या अध्यक्ष डॉ. टिना रेडकर तसेच लॅंडस्केप कलाकार शॉन पॉल आणि द बुक स्टोअरच्या संस्थापक बरखा शारदा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला ४० हून अधिक महिलांची उपस्थिती होती.
    दातांविषयी घ्यायची काळजी आणि मुलभूत आरोग्य यावर डॉ. टिना यांनी यावेळी मार्गदर्शन केले. रोझारियो यांनी भारतीय युवक काँग्रेसच्या सुपर शक्ती शी या महिला सशक्तीकरण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. गोव्यात महिलांसाठी असलेल्या विविध योजना आणि त्याचे लाभ कसे घेता येतील याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती पुरवली.
    पॉल यांनी आपल्या परिसरात उद्यान कसे तयार करायचे व त्यासाठी स्थानिक रोपांचा वापर कसा करता येईल, याबद्दल माहिती दिली.
    सिद्धार्थ मयेकर व त्यांच्या पत्नी शांती मयेकर यांच्या शांती लंच होममधील दुपारचे मासळीचे जेवण या आयोजकांनी पुरस्कृत केले होते. त्यांच्यातर्फे हायजिन किटस, सेनिटरी नॅपकिन्स आणि बिस्किटे देण्यात आली. आल्बर्ट फुर्तादो यांनी सर्व सदस्यांना ईअरफोन भेटीदाखल दिले. एसिएर टेक्नॉलॉजीस व जेनी पोझर ऑफ फिझिओथॅरेपिस्टस यांच्या सुनया शिरोडकर यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली.
    साखळीतील लाईफ फाऊंडेशन ही संस्था देहविक्रय तसेच असंघटित महिलांना मदत करते, त्यांना लैंगिक आरोग्य आणि स्वच्छता तसेच विविध चाचण्या यांचा लाभ मिळवून दिला जातो. ही बिगरसरकारी संस्थेचे व्यवस्थापन नारायण व अन्य ३ कार्यकर्ते करतात. त्याशिवाय एक डझन प्रशिक्षक काम करतात. जुने गोवा ते बाणस्तारी आणि साखळी, डिचोली, माशेल येथील महिलांना कार्यकर्ते सहाय्य करीत असतात.

    Click to rate this post!
    [Total: 1 Average: 1]
    spot_img